मुंबईत रंगणार बॅडमिंटन फिव्हर

  • सुकेश बोराळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

मुंबई - क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे बुधवारपासून बॅडमिंटन फिव्हर रंगणार आहे. टाटा समूह तसंच प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी (पीपीबीए) यांच्या वतीनं टाटा ओपन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंजच्या नव्या पर्वाची घोषणा मुंबईत करण्यात आली.

दमदार खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान होतेय. या वर्षी टाटा ओपन स्पर्धेत एकूण 17, 500 अमेरिकी डॉलरची बक्षिसं देण्यात येतायत. अंतिम फेरीचा सामना 4 डिसेंबरला होईल. रेफ्री जपानचे टोमोहारु सानो असतील.

या वर्षी भारतासह मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, आणि इंग्लड या देशांतले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतायत. नव्या पर्वाची घोषणा करताना प्रकाश पदुकोण तसंच टाटा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सुप्रकाश मुखोपाध्याय आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष केको निखोलसनही उपस्थित होते. प्रकाश पदुकोण यांनी भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. तसंच पी. व्ही. सिंधू आणि सायनाचं कौतुक करताना ते म्हणाले की, सिंधू भविष्यात नक्कीच ऑलिम्पिकमध्ये आपलं आणि देशाचं नाव आणखी मोठं करेल.

पुढील बातमी
इतर बातम्या