सीसीअाय स्नूकर स्पर्धेत मुंबईच्या हमेर मागोची धडाकेबाज कामगिरी

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रीडा

मुंबईचा १९ वर्षांचा उदयोन्मुख स्नूकरपटू हमेर मागो याने क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया इथं सुरू असलेल्या सीसीअाय अाॅल इंडिया अोपन स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत तिसऱ्या फेरीत मजल मारली अाहे. १२.२५ लाख रुपये बक्षिसांची खैरात करणाऱ्या या स्पर्धेत शुक्रवारी हमेर मागोने तेलंगणाच्या ध्रूव सिंग याचा ३-० असा धुव्वा उडवला. मध्य प्रदेशच्या केतन चावला यानेही दमदार विजयाची नोंद करत या स्पर्धेत अागेकूच केली.

निर्विवाद वर्चस्व राखले

हमेर मागोने ध्रूव सिंगविरुद्धच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात ६३-२३, ६०-३८, ७१-१५ असा सहज विजय साकारला. या विजयासह हमेरने अापला भाऊ सुमेरसह तिसरी फेरी गाठली अाहे. १३ वर्षीय सुमेरने गुरुवारी निखिल अोटमचा ३-२ असा पाडाव केला होता.

मुंबईच्या राहुल सचदेवचीही कमाल

मुंबईच्या राहुल सचदेवने प्रभावी कामगिरी करत माटुंगा जिमखान्याच्या दर्शन शाह याचा ३-० असा धुव्वा उडवला. डावखुऱ्या राहुलने सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण राखत हा सामना ७८-२०, ६४-२६, ६२-३२ असा जिंकला.

पुढील बातमी
इतर बातम्या