सेंसियो स्मॅशर्सने पटकावले एमसीएफ बॅडमिंटन लीगचे जेतेपद

बाद फेरीत जेमतेम मजल मारणाऱ्या सेंसियो स्मॅशर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या एमबीएल शटलर्सचा ३-२ असा पराभव करून पाचव्या एमसीएफ बॅडमिंटन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाला गवसणी घातली.

मंडपेश्वर सिविक फेडरेशनच्या कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात, पहिल्या दोन दुहेरीच्या सामन्यात तसेच खुल्या एकेरी अाणि खुल्या वरिष्ठ दुहेरी या चार सामन्यांपैकी प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी विजय मिळवून २-२ अशी बरोबरी साधली होती. पण रिहा राॅकी अाणि विशाल वाघ या सेंसियो स्मॅशर्सच्या दुहेरीच्या जोडीने दीपाशा कपाडिया अाणि अमोल जोशी या एमबीएल शटलर्सच्या जोडीवर सरश गेममध्ये विजय मिळवत सेंसियो स्मॅशर्सला विजेतेपद मिळवून दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या