फुटबॉलच्या सराव सामन्यात चर्नीरोड इगलचा विजय

मुंबई - 13 मार्चला जेव्हा एकीकडे संपू्र्ण भारत होळी हा सण साजरा करत होता. त्याचवेळी दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर चर्नीरोड इगल आणि चर्चगेट लायन ऑस्टेलिया फुटबॉल मॅचमध्ये एकमेंकासमोर उभे ठाकले होते.

दोन्ही संघासाठी ही एक प्रॅक्टीस मॅच होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या प्रॅक्टीसमध्ये चर्नीरोड इगल संघाने चर्चगेट लायन संघाला 31-25 ने हरवलं. राजीव आणि रेहानने 2-2 गोल केले. 

याविषयी संयोजक आणि माहिम कॅट टीमच्या कॅप्टन सुमेश सावंत याला विचारलं असता त्याने खेळाडूंना फिट राहायचे आवाहन केलं होतं. ही मॅच आधी शिवाजी पार्कात खेळली जाणार होती. मग, अंतिम क्षणी ती जागा बदलण्यात आली. या स्पर्धेत माटुंगा टायगर्स, माहिम कॅट्स, चर्नीरोड इगल, चर्चगेट लायंस, ग्रॅंटरोड बमबर्स आणि मुंबई सेट्रंल जायंट्स सहभागी झाल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या