वरळीतील NSCI केंद्राचे भव्य विलगीकरण कक्षात रुपांतर

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता, त्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानो पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने, राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (NSCI) डोमला विलगीकरण केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमला क्वारंटाइन झोनमध्ये बदलण्याची तयारी सुरू देखील झाली आहे. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

 वरळीच्या याच एनएससीआय मध्ये प्रो कबड्डीचे अनेक सामने खेळवले गेले. शेकडो रुग्णांना समावून घेण्याची या केंद्राची क्षमता आहे. एनएससीआयचे सचिव अतुल मारू यांनी बुधवारी स्पोर्टस्टारला सांगितले की, ‘कोरोना विषाणूशी संबंधित रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी अधिकारी एका योग्य जागेच्या शोधात होते. त्यांनी ही जागा पहिली व त्यांना ती योग्य वाटली. आम्हीदेखील ही जागा त्यांना उपलब्ध करून देऊन या कार्यात सरकारला आमचा पाठींबा देत आहोत.’  आमदार आदीत्य ठाकरे यांच्या हे मतदार संघातील केंद्र आहे.

दक्षिण मुंबई परिसरातील G वॉर्ड येथील संशयित रुग्णांना या ठिकाणी ठेवले जाईल. या ठिकाणी सुमारे 400-500 लोकांना वेगळे ठेवण्याची सोय आहे. पालिकेने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी आधीच सुरु केली आहे. साधारण गुरुवारपासून या जागेचा वापर करणे सुरु होईल. याबबत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले होते, ‘कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी संपूर्ण राज्य यंत्रणा कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही’. कोरोना रुग्णांसाठी आता तीन वेगवेगळी रुग्णालय स्थापन करण्यात आलेली आहे. मुंबईत अशाप्रकारे विलगीकरण केंद्रामध्ये रुपांतरीत झालेले एनएससीआय हे पहिले स्पोर्ट्स केंद्र आहे. यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमला, आवश्यकतेनुसार रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी उपलब्ध करुन देता येईल असे सांगितले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या