पिंकेथॉन मिडनाईट रनला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांनी निर्भय व्हावं, सातच्या अात घरात यावं, या धारणेला छेद देण्यासाठी रविवारी मुंबईच्या फोर्ट परिसरात युनायटेड सिस्टर्स फाऊंडेशननं पिंकेथाॅन मुंबई मिडनाईट रनचे अायोजन केलं होतं. 5 किलोमीटरची ही शर्यत एशियाटिक लायब्ररी, हाॅर्निमन सर्कल, फोर्ट येथे पार पडली.

200 पेक्षा अधिक महिलांचा सहभाग

रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडताना सर्वाधिक भीती असते ती सुरक्षेची. रात्री 12 वाजता मात्र 200 पेक्षा अधिक स्त्रियांनी या शर्यतीत सहभागी होत, नारीशक्तीचं सामर्थ्य दाखवून दिलं. मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र चौहान आणि पिंकेथॉनचे मार्गदर्शक-अभिनेते मिलिंद सोमण यांनी या शर्यतीला झेंडा दाखवला.

अाता बीकेसीत रंगणार पिंकेथाॅन शर्यत

भारतीय महिलांचं सबलीकरण दाखवून देणारी पिंकेथाॅन ही भारतातील महिलांसाठीची सर्वात मोठी शर्यत 17 डिसेंबरला मुंबईत रंगणार अाहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमअारडीए ग्राऊंडवर ही शर्यत होईल. त्यासाठी अाॅनलाइन नोंदणी www.pinkathon.in वर सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या