पिकलबॉल स्पर्धेत मुंबईच्या अतुल एडवर्डला सुवर्ण तर आशिष महाजनला रौप्य पदक

डेहराडून येथे बुधवारी झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्यूनियर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. सोबतच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशन कप पिकलबॉलमध्ये महाराष्ट्र संघाला उपविजेते पदावर समाधान व्हावे लागले. तर विजेतेपदावर राजस्थानने आपले नाव कोरले. ही स्पर्धा डेहराडून येथील परेड मैदानावर पार पडली. या स्पर्धेत ज्यूनिअर गटात महाराष्ट्राने चांगली कामगिरी करत विजय खेचून आणला. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूमध्ये कृष्णा मंत्री याने यश पाटीलचा 11-1,11-4 अशा फरकाने पराभव करत सूवर्ण पदक आपल्या खिशात घातले. तर कांस्य पदकाची कमाई देखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली. साक्षी बाविस्करने रुतूजा कालिकेचा 11-5,11-0 ने फरकाने पराभव करत विजय मिळवला.

या स्पर्धेतील दुहेरी अंतिम सामन्यात देखील महाराष्ट्राच्या खेळाडुंनी सुवर्ण पदकाची कमाई केली. अजय चौधरी-मयूर पाटील यांनी झारखंडच्या मोहम्मद जैद-मोहम्मद शाबिद अन्सारी यांचा 11-3,11-4 असा पराभव केला. तर मिश्र जुहेरीत देखील महाराष्ट्राच्या कुलदीप महाजन आणि निशा बरेला यांनी कुलदीप आणि पिंकी या दिल्लीकरांना 11-1,11-0 अशी पराभवाची धूळ चारली. ज्यूनियर गटात चांगला खेळ केलेल्या महाराष्ट्र संघाला फेडरेशन कपमध्ये आपली किमया दाखवता आली नाही. निर्णायक सामन्यात काही चुंकामुळे महाराष्ट्राला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर परुषांच्या एकेरी गटात महाराष्ट्राच्या आशिष महाजनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर महिला अंतिम सामन्यात दुहेरी फेरीत देखील रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मिश्र दुहेरीत महाराष्ट्राला सुवर्ण पदकाची कमाई झाली. महाराष्ट्राचा आतंरराष्ट्रीय खेळाडू अतूल एडवर्डने साक्षी बाविस्कर सोबत खेळताना अश्विन वधोवा आणि कविता शेखावत या राजस्थानच्या खेळाडूंना 11-3,11-5 असे नमवले.

पुढील बातमी
इतर बातम्या