मलबार हिलमध्ये तायक्वांदो

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

मलबार हिल - वाळकेश्वर मलबार हिल येथील म्युनिसिपल कवठे महाविद्यालयाच्या आवारात रविवारी 'तायक्वांदो एज्युकेशन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया'च्या वतीने 'इंटरनॅशनल मार्शल आर्टस् अँण्ड तायक्वांदो चॅम्पियन 2017' चे आयोजन केले होते. दक्षिण कोरियाचे ग्रॅण्ड मास्टर किम यंग हो यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यात सौदी अरेबियाच्या खेळाडूंसह भारतातील 389 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 8 ते 40 वयोगटांतील खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत फाईट, काता, स्वसंरक्षण, नानचाकू, लाठी काठी आदी प्रात्यााक्षिके करून दाखविण्यात आली. उत्कृष्टरित्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणाऱ्यांपैकी किरण तायक्वांदो आर्टस्, महाराष्ट्र यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, पंजाब तायक्वांदो यांना व्दितीय तर दिल्ली तायक्वांदो क्लब यांना तृतीय क्रमांकाचा मान मिळाला. या सर्व विजेत्यांना दक्षिण कोरियाचे ग्रॅण्ड मास्टर किम यंग हो यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या