International Womens Day 2022 : ५५व्या वर्षीही बॉडीबिल्डींगमध्ये ‘तिचा’ डंका

जर काही करून दाखवण्याची जिद्द असेल तर वय फक्त एक नंबर आहे. असंच काहीसं करून दाखवलं आहे मुंबईत राहणाऱ्या ५५ वर्षीयं बॉडीबिल्डर निशरीन पारिखनं... ज्या वयात लोकं रिटायरमेंटची प्लॅनिंग करतात त्या वयात निसरीन पारिखनं बॉडीबिल्डींगच्या क्षेत्रात देशाचं नाव उंचावलं आहे.

जगभरात, महिलांनी जिम्नॅस्टिक, हॉकी, क्रिकेट आणि फिटनेस स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. निसरिन पारिख यांनी भारताचं नाव बॉडीबिल्डींग क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करते. ५० वर्षांची झाल्यावर तिनं पहिल्यांदा फिटनेस इव्हेंटसाठी स्टेजवर पाऊल ठेवले.

“माझ्या ५०व्या वाढदिवशी मी स्वत:ला दिलेली ही सर्वोत्तम भेट आहे. वयाच्या प्रत्येक वळणावर मी बायको, आई, सून या सर्व जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडल्या आहेत. पण वयाच्या ५०व्या वर्षी मी स्वत:साठी काही तरी करायचं ठरवलं. यावेळी मी स्वत:ला निवडलं.”

निसरिन पारीख, बॉडीबिल्डर

जेव्हा तिला विचारलं की कधी जंक फूड खावसं वाटलं तर? त्यावर निसरीन हसत हसत म्हणाली, मी शेवटचा पिझ्झा कधी खाल्ला हे देखील मला आठवत नाही. खरं तर, 'p' असलेली कोणतीही गोष्ट — पिझ्झा, पास्ता आणि पेस्ट्री हे सर्व टाळता येण्याजोगे आहेत जर तुम्हाला तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर.

फक्त आहारच नाही तर निसरिननं ही पिळदार बॉडी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. पारेख सक्रियपणे योगा, मार्शल आर्ट्स, पॉवर लिफ्टिंग, वजन प्रशिक्षण याचा सराव करते. ५५व्या वयातही तिनं आपला सराव सोडला नाही. रोज संध्याकाळी ती सराव करते.

“तुमच्यात शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. मी दररोज पाच तास प्रशिक्षण घेत आहे. मी पहाटेच्या आधी उठते आणि मी रोज घरगुती आणि पौष्टीक आहार घेते. शरीरासाठी हानीकारक आहाराचा माझ्या जेवणात समावेश नसतो, असं ती सांगते.

ती पुढे म्हणाली की, “मी पाच तास झोपतो आणि पाच तास व्यायाम करतो. मी माझ्या योग वर्गात विद्यार्थ्यांना दोन तास प्रशिक्षण देतो, तर माझा प्रशिक्षक, तौझीफ काझी तिला आणखी दोन तास प्रशिक्षण देतो. मी रोज एक तास घरी सराव करते.”

निसरिननं बऱ्याच बॉडीबिल्डींग स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. २० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान सोल चॅलेंज ही तिची ‘सर्वात वयस्कर’ महिला बॉडीबिल्डर म्हणून पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.

त्यानंतर मुंबई श्री, महाराष्ट्र श्री आणि बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. या सर्व स्पर्धांमध्ये ती १७ ते २५ वयोगटातील मुलींसोबत स्टेजवर उतरते.

“मला माहित आहे की, मी विजेतेपद जिंकणार नाही, पण मला जगाला दाखवायचे आहे की भारतात एक तंदुरुस्त महिला आहे जी इतर महिलांना व्यायाम करण्यास प्रेरित करते. मी एक स्वप्न जगत आहे,” निशरीन म्हणते.

बोहरा-मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या निशरीनचा विवाह गुजराती जैन हिरे व्यापाऱ्याशी झाला. ५०व्या वर्षी शरीरसौष्ठव करण्याच्या तिच्या नवीन स्वप्नाला दोन्ही कुटुंबांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तिच्या या यशात तिच्या कुटुंबाचा देखील तितकाच वाटा आहे.

निसरिन पारीख यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


हेही वाचा

मुंबईत वाढताहेत महिला बाॅडीबिल्डर्स- सुनीत जाधव

शरीरसौष्ठव क्षेत्रात मराठमोळ्या सागरची 'गरुड झेप'

पुढील बातमी
इतर बातम्या