दुसऱ्या मानांकित दलविंदर सिंगची दुसऱ्या फेरीत धडक

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रीडा

जुहू विलेपार्ले जिमखान्यावर सुरू असलेल्या २२ लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या जेव्हीपीजी अनिरुद्ध देसाई अखिल भारतीय खुल्या टेनिस स्पर्धेत राष्ट्रीय विजेत्या अाणि दुसऱ्या मानांकित दलविंदर सिंगने अापली विजयी घोडदौड कायम राखली असून त्याने पहिल्या फेरीत बिगरमानांकित जतिन दहियाचा सहज पाडाव करत दुसऱ्या फेरीत धडक मारली अाहे. दलविंदरने हा सामना ६-३, ६-२ असा खिशात घातला.

कुणाल अानंदची विजयी सलामी

पुरुष एकेरीतील अन्य सामन्यात चौथ्या मानांकित कुणाल अानंदने शाहबाझ खानचे अाव्हान परतवून लावत दुसरी फेरी गाठली. शाहबाझने कुणालसमोर कडवे अाव्हान उभे केले होते. पण कुणालने अापल्या अनुभवाच्या जोरावर ६-४, ६-३ अशी बाजी मारली. पात्रता फेरीतून मजल मारणाऱ्या ध्रूव सुनिशने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी नितीन कुमार सिन्हाचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवला.

महिलांमध्ये सई समिथाची कमाल

महिला एकेरीत, दुसऱ्या मानांकित सई समिथा हिने अापल्या सलामीच्या सामन्यात सहज विजयाची नोंद केली. तिने बिगरमानांकित श्रुती गुप्ता हिचा ६-०, ६-२ असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित रिशिका सुनकारा हिने फक्त एकच गेम गमावत मिहिका यादवविरुद्धचा पहिला सामना ६-१, ६-० असा जिंकला.


हेही वाचा -

देशातील अव्वल टेनिसपटू जेव्हीपीजी मानांकन स्पर्धेत झुंजणार


पुढील बातमी
इतर बातम्या