अंडर १९ फुटबॉल वर्ल्डकपचा थरार

येत्या ऑक्टोबरमध्ये फिफा अंडर 17 विश्वचषकाचे आयोजन भारत करणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी केवळ मुलांच्या पाठिंब्यासाठी नाही, तर मुले आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रगती, त्यांच्यातील कला, कौशल्य आणि आरोग्य याकडे पालकांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे. सीएपीएफ आणि अखिल भारतीय पोलीस स्पोर्टस् कंट्रोल बोर्डच्या अखत्यारीत ही स्पर्धा संपूर्ण भारतात तीन टप्प्यात आयोजित केली जाणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ही टुर्नामेंट अंडर-19 मुले आणि मुलींसाठी राज्य आणि केंद्रशासित राज्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव-दमण येथे ही टुर्नामेंट खेळवण्यात येणार आहे. यामध्ये 8 मुले आणि 8 मुली या तीस संघात सहभागी होणार आहेत. ही टुर्नामेंट जेएनपीटी, उरण आणि चेंबूरच्या आरसीएफ ग्राऊंड येथे खेळवण्यात येणार आहे. एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, तसेच चित्रपट सृष्टीतील अभिनेता फरहान अख्तर, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि ऑलिम्पिक शूटर अंजली भागवत देखील उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत सतीष खंदारे (सीआयएसएफ) यांनी केले.

सीएपीएफ अंडर-19 फुटबॉल टुर्नामेंट या स्पर्धेमुळे खरच आनंद वाटत आहे, त्यासाठी भारत सरकारद्वारे सीएपीएफची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा व्यवस्थित असण्यासाठी सतीष खंदारे यांनी सर्व आवश्यक अशी व्यवस्था केली.

सी. विद्यासागर राव, राज्यपाल

पुढील बातमी
इतर बातम्या