एमआयजी क्लबची इंट्रा डिपार्टमेंट टी-10 क्रिकेट टुर्नामेंट

मुंबईतल्या एमआयजी क्लबला क्रिकेट विश्वात महत्त्वाचे स्थान आहे. या क्लबतर्फे आतापर्यंत अनेक टुर्नामेंटस् आयोजित करण्यात आल्या आहेत. पण यंदाच्या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य म्हणजे एमआयजी क्लबचे कर्मचारी आणि पदाधिकारीच हातात बॅट आणि बॉल घेऊन मैदानात उतरणार आहेत. 

वांद्रे एमआयजी क्लबच्या वतीने टी-10 इंट्रा डिपार्टमेंट क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या टुर्नामेंटचेे 'मुंबई लाइव्ह' मीडिया पार्टनर आहे. ही टुर्नामेंट 23 एप्रिल, रविवारी वांद्रे एमआयजी क्लबच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये क्लबमधील  कर्मचारी तसेच पदाधिकारी यांचे संघ असणार आहेत. यात जिम अँड एचसी संघ, इनडोअर डिपार्प्टमेंट, मॅनेजिंग कमिटी आणि बार XI या चार संघांचा समावेश आहे. 

रविवारी सकाळी 10 वाजता या टुर्नामेंटची सुरुवात होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण 'मुंबई लाइव्ह' च्या www.mumbailive.com या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅप, यु ट्यूब चॅनल आणि 'मुंबई लाइव्ह'च्या फेसबुक पेजवर सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

या लिंकवर क्लिक करा - T-10 Cricket Tournament Live From MIG Cricket Club Bandra


पुढील बातमी
इतर बातम्या