चेंबूरमध्ये आरसीएफएल मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत मुंबई डीएफएने स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया(SGFI) ला धूळ चारत अंडर-19 ऊर्जा कपवर आपले नाव कोरले. सोमवारी झालेल्या सामन्यात 3-2 अशा फरकाने मुंबई डीएफएने विजय मिळवला. मुंबई डीएफए संघाच्या कॅरेन पेस हिने दोन वेळा गोल करुन 2-0 ने आपल्या संघास आघाडीवर आणले.