युनियन बॅंक, मुंबई कस्टममधील सामना २-२ ने बरोबरीत

मुंबई हॉकी असोसिएशन लीग २०१७ च्या सुपर डिव्हीजनमध्ये युनियन बॅंक विरुद्ध मुंबई कस्टममध्ये झालेला रोमांचक सामना २-२ ने बरोबरीत झाला. हा सामना बुधवारी चर्चगेट येथील महिंद्रा स्टेडियमवर रंगला.

युनियन बॅंकच्या अकीब रहिमने १७ व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला १-० ने आघाडीवर आणले. पण कस्टमच्या खेळडूंनी लगेचच पेनल्टीच्या बळावर २४ व्या मिनिटाला पी. एल. थिमान्ना याने गोल केला तर २६ व्या मिनिटाला धरमबीर यादव याने गोल करत २-१ ने आघाडी घेतली. यामुळे प्रतिस्पर्धी असलेला संघ हा थोडा दबावाखाली आला. पण काहीकाळानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये आक्रमक असा खेळ दिसला. युनियन बॅंकने आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, पण कस्टमच्या खेळाडूंपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. पण ६४ व्या मिनिटाला युनियन बॅंकेच्या हरजीत सिंग याने पेनल्टीच्या बळावर गोल करत सामना हा बरोबरीत ठरला. या सामन्यात धरमबीर यादव हा मॅन ऑफ द मॅच ठरला.

पुढील बातमी
इतर बातम्या