प्रो कुस्तीत पंजाबची मुंबईवर मात

मुंबई - कर्णधार आणि ऑलिम्पिक तसंच विश्व चॅम्पिअन व्लादिमीर खिचेंगाशिविलीच्या प्रेरणादायी खेळामुळे पंजाब रॉयल्स संघानं चॅम्पिअन मुंबई महारथी संघाला मात दिली. इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या के डी जाधव कुस्ती स्टेडिअममध्ये हे सामने रंगले. पंजाबनं ही लढत 4-3 अशी जिंकली. मुंबईला प्रोत्साहन देण्यासाठी सहमालक आणि ऑफस्पिनर हरभजन सिंहही उपस्थित होता.

हा सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडिअममध्ये दाखल झालेल्या प्रेक्षकांची निराशा झाली होती. कारण मुंबईनं टॉस जिंकल्यावर पंजाबकडून खेळणाऱ्या नायजेरियाच्या पैलवान ओडुनायोला 53 किलो वजनी गटात ब्लॉक केलं.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ओ़डुनायो स्टार ठरली होती. त्यामुळे तिच्या खेळाचे बरेच चाहते आहेत. त्यामुळेच मुंबईनं धोकादायक ओडुनायोला ब्लॉक करणंच पसंत केलं. तिचा खेळ पाहायला न मिळाल्यानं चाहत्यांची निराशा झाली. पंजाबनं मुंबईच्या 74 किलो वजनी गटातल्या हासानोव्हला ब्लॉक केलं होतं. महाराष्ट्राच्या राहुल आवारेनं निकराची झुंज दिली, तरी पंजाबचा कर्णधार व्लादिमीरनं सर्व अनुभव पणाला लावून राहुलवर मात केली. त्यामुळे पंजाबचा संघ या चुरशीच्या लढतीत 4-3 फरकानं विजयी ठरला.

पुढील बातमी
इतर बातम्या