18 वर्षांखालील मुंबई पिकलबॉल स्पर्धेत गौरव ओछानी आणि दिव्या सरैय्या यांनी बाजी मारली आहे. मुंबई पिकलबॉल संघटना आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या वतीने गुरूवारी विलेपार्लेच्या डहाणूकर कॉलेज येथे ही स्पर्धा पार पडली. अटीतटीच्या लढतीत दिव्याने भक्ती आडिवरेकरचा 11-8, 11-7 असा पराभव केला. तर मुलांमध्ये गौरवने प्रतिस्पर्धी प्रणव डोईफोडेला 11-5, 11-8 ने पराभूत करत मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावले.
पिकलबॉल म्हणजे नेमकं काय?
तीन खेळांचे मिश्रण असलेला हा खेळ लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या तीन खेळांच्या मिश्रणातून बनला आहे. हा खेळ खेळण्यास खूप सोपा जरी असला तरी अधिक आव्हानात्मक आहे. तसेच या खेळात वयाची मर्यादा नाही. यामध्ये 4 वर्षांपासून ते अगदी 65-70 वर्षांपर्यंतचे लोक खेळू शकतात.