मुंबईकर अमृता ठरली ‘बेस्ट' लिफ्टर!

मुंबईची अमृता चक्रे हिने खुल्या जिल्हा वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावले, तर परुष गटात सांगलीचा महेंद्र कंदेरा याने विजेतपद पटकावले. ही स्पर्धा प्रबोधन क्रीडा संकुल विलेपार्ले येथे पार पडली. ही स्पर्धा एकूण वजनी गटाची होती. परुषांच्या गटात महेंद्र 69 किलो वजनी गटात विजेतपद आणि बेस्ट लिफ्टरचा मान मिळवला. तसेच यावेळी मुंबईच्या रंवींद्र माळीने महेंद्रला चांगलेच आव्हान दिले होते. रंवीद्र हा 85 किलो वजनीगटात होता. या स्पर्धेत मुंबईकरांनी मात्र आपला दबदबा दाखवला. एकूण 5 गटात बाजी मारत सार्वाधिक गुणांची लयलूट करून सांघिक विजेतपदाला गवसणी घातली. तसेच महिला गटात देखील मुंबईचा दबदबा जाणवला. 7 वजनीगटात झालेल्या स्पर्धत मुंबईकरांच्या नावावर एकूण 6 गटविजेतेपद आले. यात त्यांनी प्रतिस्पर्धींना धूळ चारली. तसेच 58 किलो वजनी गटातून अमृताने उत्कृष्ट अशी कामगिरी करत बेस्ट लिफ्टरचा मान मिळवला. तसेच यामध्ये ठाण्याच्या तीन स्पर्धकांनी देखील 56 किलो वजनी गटात मयूर म्हसे, विजय फासले आणि राहुल जाधव यांनी देखील यात आपले नशीब झळकावले.

वेटलिफ्टिंग हा आरोग्यासाठी खरेतर एक उत्तम खेळ आहे. हा एक जिमनॅस्टिकसारखा खेळ आहे. दरवर्षी याचे आयोजन करतो आणि हळूहळू मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. तसेच या खेळात मोठ्या प्रमाणात पोलीस खात्यातले पुरुष आणि महिला खेळाडू आहेत. 

प्रकाश  गव्हाणे, अध्यक्ष, मुंबई वेटलिफ्टिंग असोसिएशन

गटनिहाय निकाल

पुरुष गट
प्रथम
द्वितीय
तृतीय
56 किलो वजनी गट
 विजय फासले (ठाणे)
 राहुल जाधव(ठाणे)
 मयुर म्हसे(ठाणे)
62 किलो
 रोहित परब
 चेतन जाधव (मुंबई)
 जय सोनिग्रा (मुंबई)
69 किलो
 महेंद्र कंदेरा (सांगली)
 अझाझ शेख (मुंबई)
 गिरिश घोडे (ठाणे).
77 किलो
 अजिंक्य शेनोडे (मुंबई)
 प्रणित शिंदे (मुंबई)
 शिवाजी महाजन (मुंबई)
85 किलो
 रविंद्र माळी (मुंबई)
 सुरेश प्रसाद (मुंबई उपनगर)
 आशिष सुर्वे (मुंबई)
94 किलो
 अनुप कदम(मुंबई)
 इंद्रजीत मोहिते (मुंबई)
 अबरार पंगेरकर (नवी मुंबई)
105 किलो
 अजित पाटील (मुंबई उपनगर)
 प्रमोद जाधव (मुंबई)
-
105 हून अधिक
 मनोज मोरे (मुंबई)
 प्रमोद जाधव (मुंबई)
-



महिला गटप्रथम
द्वितीय
तृतीय
48 किलोगनिता चव्हाण (मुंबई)कामिनी बी. (ठाणे)
योगिता गोरे (मुंबई)
53 किलो
योगिता बगुल (मुंबई)कुसुम मौर्या (मुंबई)

58 किलो
अमृता चक्रे (मुंबई)पुनम कातकरी (ठाणे)

63 किलो
विनया माने (मुंबई)शिवानी मोरे (मुंबई)
ॠणाली धुमाळ (ठाणे)
69 किलो
माधवी साळुंखे (मुंबई)आशा फोळणे (दोघी मुंबई)

90 किलो
वैशाली पवार (मुंबई)

90 किलो
अशिता भोईर (ठाणे)


पुढील बातमी
इतर बातम्या