29 डिसेंबरपासून राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा

मुंबई - वनवासी क्षेत्रातील युवकांमध्ये असलेलं क्रीडा कौशल्य शोधण्याच्या उद्देशानं अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीनं 29 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत चेंबूरच्या आर.सी.एफ मैदानावर राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेत नेपाळ आणि 25 राज्यांमधील 350 तिरंदाज सहभागी होणार आहेत. वनवासी कल्याण आश्रम संस्था 1952 पासून देशभरातील वनवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करते आहे. या संस्थेमार्फत स्वदेशी खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात.

तिरंदाजी या खेळातलं वनवासी समाजाचं  विशेष कौशल्य लक्षात घेऊन दरवर्षी तिरंदाजीच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदा मंबईत होणाऱ्या या स्पर्धेचं हे एकोणिसावं वर्ष आहे. 29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या हस्ते होईल. तसंच राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडेही या वेळी उपस्थित असतील. स्पर्धेचा समारोप 1 जानेवारीला होणार असून, या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित असतील.

पुढील बातमी
इतर बातम्या