मरिन ड्राईव्हवर पॉवरबोट रेसिंगचा थरार!

मुंबई - येत्या 3 मार्चला मरिन ड्राईव्हच्या समुद्रात पी-1 पॉवरबोट इंडियन ग्रांप्री रेसिंग होणार आहे. त्यामुळे पाण्यामध्ये वॉटरबॉल्सच्या सहाय्याने ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेची आधी पात्रता फेरी होईल. त्यातून जे स्पर्धक पात्र ठरतील त्यांनाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसंच 3 दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा या वेळी प्रेक्षकांनाही चित्तथरारक अनुभव घेता येणार आहेत. 

पी-1 प्रकारातल्या पॉवरबोट कशापद्धतीने काम करते याचं प्रात्यक्षिक या वेळी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणाशी अनुकूलता, सुरक्षा, डिजिटल टेलीमेट्री याची उत्तम सांगड या पॉवरबोटच्या रचनेत केली आहे. नेक्सा पी-1 ग्रांप्री स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व सीएस संतोष करणार आहे. या स्पर्धेची आधी पात्रता फेरी होईल. त्यातून जे स्पर्धक या पॉवरबोट स्पर्धेसाठी पात्र ठरतील त्यांनाच या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. 


या वर्षी रेसिंगमध्ये एकूण 7 संघ सहभाग घेणार आहेत. प्रत्येक संघात दोन पी -1पँथर पॉवरबोट असणार आहेत. या रेसिंगचं अंतर 5.2 किमी असणार आहे. अंतिम रेसिंग 5 मार्चला होणार आहे. या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत.



पुढील बातमी
इतर बातम्या