पॉवर बोटिंग स्पर्धेत परदेशी स्पर्धकांची बाजी

  • सुकेश बोराळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

नरिमन पॉईंट - मुंबईत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पॉवर बोटिंग या स्पर्धेचा थरार शुक्रवारी मुंबईकरांनी अनुभवला. मरीन ड्राईव्ह ते नरिमन पॉईंटपर्यंत संपूर्ण चौपाटीच्या किनाऱ्याला बरेच प्रेक्षक स्पर्धा पाहण्यासाठी जमा झाले होते. 

शुक्रवारच्या पात्रता फेरीत बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी या कोलमन भावंडांनी बाजी मारत शनिवारी होणा-या पहिल्या शर्यतीसाठी पोल पोझिशन मिळवली. या दोघांनी उत्तम अशा प्रकारे शर्यत खेळून 2 मिनिटे 25 सेकंद 73 सेमी सेकंदची वेळ देत आपली पोझिशन मिळवली. यात विशेष म्हणजे हे दोघे भावंड आहेत. यांच्या विरुद्ध असलेल्या मर्लिन संघाच्या जेम्स नॉर्विल आणि ख्रिस्तियन पार्सन्सयंग यांच्याकडून कडवी लढत मिळाली. तर किंचीत अशा फरकाने जेम्स- ख्रिस्तियन यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांनी 2 मिनिटे 25 सेकंद 74 सेमी सेकंदची वेळ नोंदवली. तसेच या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सी एस संतोष याला 2 मिनिटे 31 सेकंद 55 सेमी सेकंदवर नववे स्थान पटकावले. तर यामधील दुसरा भारतीय असलेला गौरव गिलने सातवे स्थान मिळवले.

‘विराट’ चषक
भारताची ऐतिहासिक युद्धनौका ‘आयएनएस विराट’ देशाच्या सेवेतून निवृत्त होत असली तरी, पी 1 पॉवरबोटच्या स्पर्धेनिमित्त ही युध्दनौका अनेकांना प्रेरणा देईल. या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणारा चषक विराट युद्धनौकेच्या पत्र्यापासून तयार करण्यात आले आहे. भारताचे पश्चिम नौदलाचे प्रमुख व्हाईस अॅजडमिरल गिरिष लुथरा यांच्या हस्ते या आकर्षक चषकाचे अनावरण करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या