मुंबईत शनिवारपासून महिला टेनिसचा थरार

आंतरराष्ट्रीय टेनिसचा थरार पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर भारतात 'डब्ल्यूटीए मुंबई ओपन' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 'जागतिक महिला टेनिस'मध्ये अव्वल ५൦ मध्ये असणाऱ्या टेनिसपटूंचा खेळ बघण्याची संधी स्पर्धेच्या निमित्तानं मिळणार आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) इथं १७ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ही स्पक्धा खेळवण्यात येणार आहे. अमृती फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे.

कोणते भारतीय खेळाडू होणार सहभागी?

डब्ल्यूटीए मुंबई ओपन स्पर्धेत भारतातील चार अव्वल खेळाडूंना वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे भारताच्या चार खेळाडूंना मुख्य फेरीत थेट प्रवेश दिला जाणार आहे. भारताची अव्वल खेळाडू करमन कौर थंडी, महाराष्ट्राची अव्वल खेळाडू रुजुता भोसले त्याचबरोबर जागतिक ज्युनियर क्रमवारित १८व्या क्रमांकावर असलेली झील देसाई या चार प्रमुख खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. तर दोन उभरत्या युवा भारतीय खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश

महिला लॉन टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ७८व्या क्रामांकावर असलेल्या बेलारुसची १९ वर्षीय आर्यन सबालेंका हिला या स्पर्धेसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे. तर या स्पर्धेतील दुसरे मानांकन जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्यंपदकाला गवसणी घालणारी तसेच २१० विम्बल्डन आणि युएस ओपनचे उपविजेतेपद पटकावणारी रशियाची वेरा झोनारेव्हाला देण्यात आले आहे. यासोबतच जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावर झेप घेणा-या बेल्जियमची यानिना विकमेयर सारखे आतंरराष्ट्रिय खेळाडू देखील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत १९ देशांतील खेळांडू सहभागी होणार आहेत.

विजेत्यांना देण्यात येणारं बक्षीस

विजेत्या स्पर्धकाला २० हजार डॉलर तर उपविजेत्याला ११ हजार डॉरल पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण १ लाख २५ हजार डॉलर (80लाख) रकमेचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या