दादर - मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि मुंबई इंडियन्स आयोजित फुटबॉल स्पर्धेत सेंट पॉल हायस्कूल संघ विजयी ठरला. शुक्रवारी कुपरेज ग्राउंडवर झालेल्या अंतिम लढतीत सेंट पॉल हायस्कूल संघाने अंधेरीच्या सेंट रॉक हायस्कूल संघावर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला.