सलाम बॉम्बे वॉरिअर्सची सेंट मेरी बॉयवर मात

मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर लिटल मास्टर चॅलेंज इंटरस्कूल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सलाम बॉम्बे या फाऊंडेशनतर्फे दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. ही संस्था गेेली 11 वर्षे हा उपक्रम राबवत आहे. या स्पर्धेत 620 तरुणांनी आणि 40 शाळेतील संघानी सहभाग घेतला होता. ही  क्रिकेट स्पर्धा 14 वर्षांखालील वयोगटातल्या मुलांसाठी होती.

बुधवारी सलाम बॉम्बे फाऊंडेशन वॉरियर्स विरूद्ध सेंट मेरी बॉय संघामध्ये अंतिम सामना रंगला. या अटीतटीच्या सामन्यात सलाम बॉम्बे वॉरियर्सने सेंट मेरी बॉयजला 14 धावांनी पराभूत करत विजयावर नाव कोरले. 

सलाम बॉम्बे वॉरिअर्सचा तन्मय गोटावडे हा सामनावीर ठरला तर कुशनेद खान उत्कृष्ट फलंदाज ठरला. यासोबत सेंट मेरी संघाचा चिन्मय पाताडे मालिकावीर ठरला. त्याने 5 डावांत 267 धावा करण्याचा केल्या.

यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे आणि माजी भारतीय विकेट किपर चंद्रकांत पंडित हे उपस्थित होते.

शहरातील मुलांचे टॅलेंट पाहून मी भारावून गेलो आहे. माझे भाग्य आहे की मला या मुलांसोबत काम करायला मिळाले. तसेच त्यांच्यातील टॅलेंट खुलवण्यासाठी मी त्यांची मदत केली, त्यांना मार्गदर्शन केले. ही मुले ज्या अवस्थेतून येतात त्याला तोंड देऊन ते पुढे येतात हे पाहून मला आनंद वाटतो.

चंद्रकांत पंडित, माजी क्रिकेटपटू

पुढील बातमी
इतर बातम्या