डिलाईल रोडवर पीळदार स्नायूंचे युद्ध रंगणार

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रीडा

सध्या शरीरसौष्ठव स्पर्धांचा हंगाम एेनबहरात असताना अाता डिलाईल रोडवरही पीळदार स्नायूंचे घमासान युद्ध रंगणार अाहे. डिलाईल रोड येथील शिवशंकर उत्सव मंडळातर्फे रविवारी (४ मार्च) शिवशंकर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले अाहे. ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डिंग असोसिएशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांची मान्यता लाभलेली ही स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूल मैदान, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड, मुंबई - ४०००१३ येथे रंगणार अाहे.

अडीच लाखांची बक्षिसं

ही स्पर्धा ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ आणि ८५ किलोवरील अशा एकंदर सात वजनी गटांमध्ये होईल. विजेत्यांना एकूण अडीच लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार अाहेत. शिवशंकर श्री किताब पटकावणाऱ्याला ५१ हजार रुपये अाणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल. सर्वोत्तम पोझरला ५ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या ५ विजेत्यांना अनुक्रमे ८ हजार, ६ हजार, ४ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये अशी बक्षिसे मिळतील. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नामवंत शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या