श्रेयस अय्यर सांभाळणार कोहलीची जागा

मुंबई - मुंबईच्या श्रेयस अय्यरला धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यासाठी विराट कोहलीच्या जागेवर खेळवलं जाणार आहे. 22 वर्षीय खेळाडू श्रेयसला तातडीने धरमशालातल्या भारतीय संघात सामील होण्याचा संदेश बीसीसीआयनं दिला आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये धरमशाला येथे चौथा आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यात विराट खेळेल की नाही यावर संशय आहे. कारण कोहलीला रांची टेस्टमध्ये खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे जर त्याची प्रकृती सामन्यासाठी अनुकूल असेल तरच तो खेळेल. नाहीतर विराटच्या जागी श्रेयसला खेळवलं जाईल. शुक्रवारी अय्यर धरमशाला येथे पोहोचेल. श्रेयस अय्यरने टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघासमोर 'भारत ए' या संघाकडून खेळत असताना नाबाद 202 रन्स केले होते. त्याच्या याच खेळीनंतर त्याला विराटच्या जागी खेळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

तसंच गेल्यावर्षी हैदराबादमध्ये झालेल्या बांग्लादेश आणि भारत या सामन्यात श्रेयसने शतक पूर्ण केलं होतं. जर, विराट हा अंतिम सामना खेळू शकला नाही तर, मुंबईच्या अजिंक्य रहाणेला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया 1-1 अशा बरोबरीवर आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष चौथ्या आणि अंतिम सामन्यावर लागलंय. हा सामना शनिवार पासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आपली ताकद लावणार आहे. पण, भारतीय संघातील मजबूत दुवा आणि संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या खेळण्यावर अजूनही संभ्रम आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या