दक्षिण-मध्य रेल्वे संघानं मारली बाजी

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

गोरेगाव - आंतर रेल्वे महिला कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण मध्य रेल्वेच्या महिलांनी विजय मिळवला. चमकदार खेळ केलेल्या मध्य रेल्वे संघाचा 15-12 असा पराभव केला आणि पदक जिंकलं. मात्र मध्य रेल्वे संघाला 40 व्या आंतर रेल्वे महिला कबड्डी स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. ही स्पर्धा दक्षिण-पूर्व रेल्वे क्रीडा संघटनेच्या वतीनं कोलकाता येथे भरवण्यात आली होती. या सामन्यात मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे या दोन संघामध्ये चांगली स्पर्धा रंगली. मध्य रेल्वे संघाने मेघना, रेखा सावंत आणि मुथव्वा क्षितिजा यांच्या शानदार खेळाच्या जोरावर चढाईत गुण मिळवले. दुसर्‍या सत्रात दोन्ही संघ आक्रमक खेळले. सोनाली इंगळे, जयश्री आणि मालेश्‍वरी यांच्या भक्कम पकडीमुळे मध्य रेल्वेने गुणांची कमाई करताना विजयी मार्गावर आगेकूच केली. मात्र, काही मिनिटं शिल्लक असताना दक्षिण-मध्य रेल्वे संघाने खोलवर चढाई आणि मजबूत पकडीच्या जोरावर ३ गुणांच्या फरकाने मध्य रेल्वेला धक्का दिला. प्रशिक्षिका सुनीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वेनं पदकांची कमाई केली.

पुढील बातमी
इतर बातम्या