हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी झेंडा, महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव, मोनिका आथरेची बाजी

  • तुषार वैती & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंनी चमक दाखवत पहिल्या तीन क्रमांकावर वर्चस्व गाजवलं. पुरुषांमध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा पण मूळचा कोल्हापूरकर असलेल्या दीपक कुंभारने तिसरं स्थान मिळवलं. तर महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधवने पाहिलं आणि मोनिका आथरेने दुसऱ्या स्थानावर कब्जा केला.

प्रोकॅम इन्टरनॅशनलच्या वतीने रविवारी सकाळी टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला तमाम मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. अर्धमॅरेथॉनची सुरुवात वरळी सीफेसवरील वरळी डेअरीसमोरुन झाली.

अर्धमॅरेथॉनमध्ये पुरुष गटात खऱ्या अर्थाने वर्चस्व राहिलं ते आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचं. इन्स्टिट्यूटच्या प्रदीप सिंगने १:०५:४२ अशी वेळ नोंदवत पहिलं, शंकर मान थापाने १:०६:४० अशी वेळ नोंदवत दुसरं आणि दीपक कुंभारने १:०६:५४ अशी वेळ नोंदवत तिसरं स्थान मिळवलं.

अर्धमेरेथॉन महिलांमध्ये संजीवनी जाधवने १:२६:२४ अशी वेळ नोंदवत पाहिलं, मोनिका आथरेने १:२७:१५ अशी वेळ नोंदवत दुसरं आणि जुमा खातूनने १:२७:४८ अशी वेळ नोंदवत तिसरं स्थान पटकावलं.

पुढील बातमी
इतर बातम्या