भारत- इंग्लंडची मॅच टाय

मुंबई - भारतीय अंडर -19 क्रिकेट संघ आणि इंग्लंड अंडर -19 संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या 5 मॅचमध्ये एकदिवसीय मालिकेतील पाचवी आणि अंतिम मॅच बुधवारी टाय झाली. इंग्लंड अंडर - 19 संघाने फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 9 गडी गमावत 226 धावा बनवल्या. तर या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाच्या 226 धावा झालेल्या असताना भारताची शेवटची विकेट ही 50 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गेली. 

भारतीय संघाचा कर्णधार अभिषेक शर्माने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लडचा सलामीचा फलंदाज हेनरी ब्रुक्स 14 धावांवर बाद झाला. इशान पोरेलने त्याची विकेट घेतली. तर, इंग्लंडच्या हेनरी ब्रुक्सने भारताच्या सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. जैक ब्लेथरवीक, आर्थर गोड्सल आणि डेलरे रॉलिंस यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. लियाम पेटरसेन वाइटने एक विकेट घेतली.

पुढील बातमी
इतर बातम्या