फिडे बुद्धिबळात विक्रमादित्य, समीर, सौरभ, राकेशची विजयी सलामी

दुसऱ्या रिलायन्स होम फायनान्स खुली फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेतल्या सलामीच्या लढतीत इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे, फिडे मास्टर सौरभ खेडेकर, राकेश कुलकर्णी आदी अग्र मानांकित बुद्धिबळपटूंनी विजय मिळवत एक गुण वसूल केला. युनिव्हर्सल चेस फाउंडेशन आणि दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे आयडियल स्पोर्ट्स अकादमी सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत राज्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिडे गुणांकित 122 बुद्धिबळपटूंसह 251 खेळाडू सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेमधील विजेत्या आणि उपविजेत्यांना एकूण तीन लाख रुपयांचे 47 पुरस्कार असून सबज्युनियर मुलामुलींना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण 42 आकर्षक चषक स्वरुपात पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धेला मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोसिएशन, ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि फिडे यांची मान्यता लाभली आहे. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहाय्यक सचिव नितीन वर्दे, संयोजक विहंग कुलकर्णी, विठ्ठल माधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या