'परे'नं पटकावलं जेतेपद

  • अमोल करडे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

बोरीवली - बलाढ्य पश्चिम रेल्वेने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना कट्टर प्रतिस्पर्धी मध्य रेल्वेचे कडवे आव्हान 3-1 असे परतवून लावत आरसीएफ प्रिमीयर कप फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एकट्या रुबेन डिसूजाने 3 गोल नोंदवताना सामन्यावर निर्विवाद वर्चस्व राखले. चेंबूर येथील आरसीएफ मैदानावर झालेल्या या सामन्यात पश्चिम रेल्वेने एकहाती वर्चस्व राखले. सुरुवातीपासूनच ‘परे’ने आक्रमक पवित्रा घेताना ‘मरे’ला दबावाखाली ठेवले. रुबेनने जबरदस्त आक्रमण करताना मरेची बचावफळी सहजपणे भेदली. त्याचवेळी, परेच्या बचावफळीने भक्कम संरक्षण करताना मरेच्या आक्रमणातली हवा काढली. तरी, प्रभाष जनार्दन याने एक गोल करुन मरेच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, परेच्या धडाक्यापुढे निभाव न लागल्याने अखेर मरेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, झालेला फ्रादर अ‍ॅग्नेल आणि बॉडिलाईन एफसी यांच्यात झालेला महिलांचा अंतिम सामना टायब्रेकपर्यंत चुरशीचा रंगला. टायब्रेकमध्ये मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना अवघ्या एका गोलच्या निर्णायक आघाडीच्या जोरावर अ‍ॅग्नेल संघाने 5-4 अशी बाजी मारत जेतेपद पटकावले.

पुढील बातमी
इतर बातम्या