मुंबई वायफायमय...

मुंबई - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुंबई शहरातील प्रमुख ठिकाणी वायफाय सेवा सुरु करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मुंबईतील पहिल्या टप्प्यात ठिकठिकाणी जवळपास 500 वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात आले आहेत. प्रामुख्याने मुंबईतील पोलीस आयुक्तालय, विधानभवन, वांद्र्यातील कलानगर आणि मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही भागात वायफाय सेवा सुरु करण्यात आली आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी यादरम्यान वायफायची चाचणी घेण्यात आली. यावेळी एकूण 23,000 युजर्संकडून वायफायचा वापर करण्यात आला. तसेच, दोन टीबीपेक्षा जास्त डेटा डाऊनलोड करण्यात आला, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या