२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर

कोरोना काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Appleनं आता आपले ऑनलाइन स्टोअर भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. Apple ऑनलाइन स्टोअर २३सप्टेंबर रोजी भारतात सुरू होईल. यामुळे ग्राहकांना Apple उत्पादनांची संपूर्ण श्रेणी मिळेल. आयफोन निर्माता अद्यापपर्यंत भारतात विक्रीसाठी त्याच्या अधिकृत किरकोळ विक्रेत्यांपुरते मर्यादित होते.

जगातील Apple स्टोअरमध्ये मिळणारा तोच अनुभव कंपनीच्या ऑनलाइन टीम सदस्यांद्वारे कंपनीनं देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक कंपनीच्या वाढिसाठी मुख्य बाजारपेठांपैकी भारत एक असल्याचं बोलत आहेत. 

दरम्यान, Apple ऑनलाइन स्टोअरचा मुख्य हेतू हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा स्मार्टफोन बाजारात आणणे हा आहे. या हालचालीमुळे Apple केअर प्लस सारख्या हॉलमार्क सेवा भारतात आणता येतील. ज्यामुळे Apple वापरकर्त्यांना इथं खरेदी केल्यास फायदा होईल.

Apple ऑनलाइन स्टोअरच्या मदतीनं, ग्राहक व्यापार आणि वित्तपुरवठा पर्यायांचा फायदा घेण्यास सक्षम असतील. ज्यामुळे आयफोन आणि मॅक सारख्या कंपनीची उत्पादनं अधिक परवडतील. दरम्यान, विद्यार्थ्यांना आयपॅडसारख्या उत्पादनांवरील शैक्षणिक सवलतीचा लाभ घेता येणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या