थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर ड्रोनची नजर

मुंबई - थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ड्रोनच्या साहाय्यानं लक्ष ठेवण्यात येणार आहे. ज्या भागात सीसीटीव्ही नसतील तिथं व्हिडीओग्राफी आणि ड्रोनच्या मदतीनं लक्ष ठेवण्यात येईल, असंही मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी स्पष्ट केलं.

थर्टीफर्स्टला हॉटेल्स, समुद्र किनाऱ्यावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांमध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग असतो. या वेळी अनेक छेडछाडीच्या घटनाही समोर आल्यात. त्यामुळे मुंबई पोलीस अशा पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. त्यात महिला अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. त्यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास तिथच संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.

ड्रंक अँड ड्राइव्हच्या मोहिमेत जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहतुककोंडी टाळण्यासाठी काही गर्दीच्या ठिकाणांची नो डायवरशन, नो पार्किंगची यादी करण्यात आली आहे. मद्यपान करून ड्राइव्ह करणाऱ्यांवर वेळीच कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या