बिग बास्केटच्या २ कोटी ग्राहकांचा डेटा लिक

बिगबास्केटच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. या बिग बास्केट वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जात असल्याचा अंदाज आहे. सायबर इंटेलिजन्स (cyber intelligence) कंपनी साबइलनं (Cyble) दिलेल्या माहितीनुसार बिगबास्केटच्या २ कोटी ग्राहकांचा डेटा चोरीला गेला आहे. या संदर्भात कंपनीनं बेंगळुरूतील सायबर क्राईम विभागात गुन्ह्याची नोंद केली आहे.

Cybleनं दिलेल्या माहितीनुसार, एका हॅकरनं डार्क वेबवर बिगबास्केटचा हा डेटा ३० लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी ठेवला आहे. डार्क वेबच्या नियमित तपासादरम्यान साइबलच्या टीमला हा डेटा ४० हजार अमेरिकन डॉलरला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे, असं दिसून आलं.

डेटामध्ये ग्राहकांची नावं, ई-मेल आईडी, पासवर्ड हॅशेज, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, ठिकाण आणि आयपी अड्रेसचादेखील समावेश आहे. बिगबास्केट वन-टाइम पासवर्डचा वापर करते. जो प्रत्येकवेळी लॉगईन करताना बदलत असतो. Cybleनं यामध्ये या पासवर्डचा उल्लेख केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना बिगबास्केटनं सांगितलं की, काही दिवसांपूर्वी आम्हाला या पद्धतीनं डेटा चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. यासंदर्भात आम्ही माहिती घेण्याचा आणि तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत बेंगळुरू स्थित सायबर क्राईम विभागात गुन्ह्याची नोंद केली आहे. याआधी देखील अनेक कंपन्यांचा आणि त्यांच्या ग्राहकांचा डेटा चोरीला गेला आहे. बिगबास्केट ही चोरी झाली आहे का हे तपासून पुढचं पाउल उचलणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या