हवामानाचं अंदाज घेण्यासाठी दुसरं डॉपलर

अंधेरी - मुंबईतील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कुलाबा परिसरात रडार लावण्यात आलं होतं. परंतु, मुंबईतल्या गगनचुंबी इमारतींमुळे निरीक्षणात अडथळे येत असल्याचं समोर आलं. त्यामुळे हवामान विभागाचं दुसरं डॉपलर वेरावली उच्च जलाशय भागातल्या अतिरिक्त जागेत बसवण्यात येणार आहे. पालिकेच्या सुधार समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईला 26 जुलै 2005 साली जलप्रकोपाला सामोरं जावं लागलं. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अटल बिहारी दुबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, हवामानाचा अंदाज घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवणं अशा अनेक बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. या याचिकेनुसार न्यायालयानं हवामान विभागाचे दुसरे डॉपलर रडार बसविण्यासाठी 4 आठवडयात जागा निश्चित करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. या आदेशानुसार वेरावली उच्चस्तर जलाशयाची जागा निश्चित करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या