मुंबईची व्हर्च्युअल मेट्रो स्थानकं!

मुंबई - दिग्दर्शक आनंद गांधींच्या मेमेसीस कल्चरल लॅबमध्ये मुंबईच्या मेट्रो स्थानकांची आभासी दृश्यं पाहता येत आहेत. गांधी यांच्या या कंपनीने भारतात आभासी वास्तविकता क्षेत्रात इल्स व्ही. आर. लॉन्च करून भारतात प्रथम व्ही. आर. प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय. दर्शकांनाही अनुभव घेता यावा म्हणून आजाद नगर, अंधेरी और घाटकोपर मेट्रो स्थानकांवर व्ही. आर. बूथ बसवण्यात आले आहेत.

यामध्ये 'जलमग्न,' 'जात ही अफवा नाही, 'इनसाइड दंगल, 'जब सारे देश को खो दिया है, 'हम कोयला खाते है?', पर्दे के पीछे', 'राइट प्रार्थना करने के लिए' आणि 'धाकड है' यांचा सहभाग आहे. कंपनीच्या मुंबई मेट्रो स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 13 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यासाठी अॅमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया आणि ऑक्सफेम इंडिया याची मदत घेण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या