4जी नंतर आता 5जी इंटरनेट सेवा मिळणार!

मुंबईसह देशभरात सध्या 4जी इंटरनेटची चलती आहे. पण 2020 पर्यंत 5 जी इंटरनेट सेवा ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

केंद्र सरकारने 5जी ची ही सेवा सुरू करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. कृती आराखडा तयार करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दूरसंचार, आयटी आणि तंत्रज्ञान या तीन मंत्रालयातील सचिव यांचा समावेश असेल. ही सेवा सुरू करण्यासाठी 500 कोटींचा आर्थिक निधी लागणार आहे.

देश-विदेशात 5जी ही सेवा 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे.

कशी असेल ही सेवा?

  • शहरात १० हजार मेगाबाइट प्रति सेकंद (एमबीपीएस)
  • ग्रामीण भागात १ हजार मेगाबाइट प्रति सेकंद (एमबीपीएस)
पुढील बातमी
इतर बातम्या