फेसबुकवरून ऑनलाइन शॉपिंग

मुंबई - फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कवर केवळ मनोरंजनात्मक मेसेज न टाकता यापुढे त्याचा वापर करून व्यावसायिक लाभही उठवता येणार आहे. यासाठी फेसबुकने स्वतःची ऑनलाइन मार्केटप्लेस सुरू केली. क्रेग्सलिस्ट या ऑनलाइन विक्रीला शह देत फेसबुकने ईबेसारख्या ऑनलाइन मार्केटला पर्यायी यंत्रणा उभी केली आहे. अशा पद्धतीने स्वतःच काही फेसबुक वापरकर्त्यांनी एकत्र येऊन त्यातून व्यापार सुरू केला होता. त्याला अधिक व्यापक रूप दिल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुक हे लोकांना जोडण्याचे समाज माध्यम आहे. गेल्या काही वर्षांत एकमेकांबरोबर खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी फेसबुकचा वापर करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे, असे फेसबुकचे प्रॉडक्ट व्यवस्थापक मेरी कु यांनी म्हटले आहे.

फेसबुकवर सध्या दरमहिन्याला तब्बल ४५ लाख लोक भेट देतात आणि खरेदी-विक्री करतात. या नव्या सुविधेमध्ये विकता येणाऱ्या वस्तूचे चित्र दिसणार आहे. फेसबुक वापरणाऱ्याला त्याच्या परिसरातील विक्रेत्याच्या वस्तू पाहता येणार आहेत. ही सुविधा फेसबुकच्या अॅपवर उपलब्ध असून येत्या काही महिन्यांत त्याची डेस्कटॉप आवृत्ती येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या