ट्विटरवर महिला 'या' विषयी करतात सर्वाधिक चर्चा, सर्वेतून माहिती उघड

जगभरात कोट्यवधी युजर्स सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यात महिला वर्गाची संख्याही लक्षणीय आहे. ट्विटरनं महिला दिनाचं औचित्त साधत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर महिला सर्वाधिक कोणत्या विषयावर ट्विट करतात याचा आढावा घेतला आहे. यासाठी महिला दिनाचे निमित्त साधून एक सर्व्हेक्षण केलं आहे.

जानेवारी १९ ते फेब्रुवारी २० या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ७०० महिला सामील झाल्या होत्या. यासाठी ५ लाख २२ हजार ९९२ ट्विटसचे अध्ययन केले गेले. देशातील १९ शहरातील महिला यात सामील असून ९ कॅटेगरी मध्ये हे सर्व्हेक्षण केले गेले आहे.

या सर्व्हेक्षणात असं दिसून आलं की, महिला त्यांची आवड म्हणजे पॅशन याबद्दल सर्वात जास्त ट्विट करतात. हे प्रमाण २४.९ टक्के इतके आहे. यात फॅशन, पुस्तके, ब्युटी, एंटरटेनमेंट, फूड याचा समावेश आहे. करंट अफेअर २०.८ टक्के, सेलेब्रिटी मोमेंट १४.५ टक्के, समाज विषयक ११.७ टक्के तर सामाजिक बदल या विषयात ८.७ टक्के अशी ही आकडेवारी आहे.

या पैकी सेलेब्रिटी मोमेंटला सर्वाधिक लाईक्स आणि रिप्लाय आहेत. यात चेन्नई आघाडीवर असून सामाजिक विषयात बंगळुरु, पॅशन बाबत गुहाटी इथल्या महिला आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे ११.७ टक्के महिला एक दुसऱ्याशी कनेक्ट होण्यास तयार नाहीत असंही आढळलं असून ही बाब चिंताजनक असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे.

एकंदरीत, ३३ टक्के महिला म्हणाल्या की, ते प्रवास करताना ट्विटरचा वापर करतात, २९ टक्के न्याहरीच्या वेळी वापरतात, २४ टक्के जागेवर तर २२ टक्के झोपायच्या आधी ट्विटर वापरतात.


पुढील बातमी
इतर बातम्या