कांदीवली - ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये टेक्नोफेस्ट 2017 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या फेस्टचे आयोजन आधुनिक पद्धतीने करण्यात आले होते. या फेस्टमध्ये मुलांनी शेतीविषयक प्रोजेक्ट सादर केले. यामध्ये पिकांवर मारण्यात येणाऱ्या किटकनाशकाचा कसा वापर करता येऊ शकतं याचेही सादरीकरण करण्यात आले होते. तसेच अशुद्ध पाणी स्वच्छ करण्याचे मशिन देखील या फेस्टमध्ये सादर करण्यात आले होते.