आयडिया-व्होडाफोन एक होणार?

मुंबई - रिलायन्स जिओच्या फ्री ऑफर नंतर भारतीय टेलिकॉम बाजारात स्पर्धा सुरू झाली आहे. भारताच्या 26 अरब डॉलर म्हणजेच 1,77,055 करोड रुपयांच्या टेलिकॉम बाजारात एअरटेलला पाठी टाकून रिलायन्स जिओ आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आता बाजारात रिलायन्सलाही फटका पडेल असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनी आयडिया आणि व्होडाफोनच्या भारतीय युनिटचं विलीनीकरण होणार आहे. एअरटेलचे आतापर्यंत एकूण 23 करोड ग्राहक आहेत. त्यामुळे बाजारात एअरटेल प्रथम स्थानी आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणानंतर ही संख्या जवळपास 39 करोड एवढी होईल. ही ग्राहक संख्या एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन्ही पेक्षा खूप जास्त असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या