व्हॉट्सअॅपवर आता करा व्हीडिओ कॉल

मुंबई - व्हॉट्सअॅपची व्हीडिओ कॉलिंग सेवा 15 नोव्हेंबरपासून अखेर सुरू झाली आहे. अँड्रॉइड, आयफोन आणि विंडोज फोन यूझर्स आता व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांना व्हीडिओ कॉल करू शकतील. वायफाय कनेक्टेड असाल तुम्ही मोफत व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकाल, अन्यथा तुमच्या मोबाइल कंपनीच्या डेटानुसार इंटरनेटचा दर लागू होईल. व्हीडिओ कॉलिंगची सुविधा सुरू होण्यासाठी यूझर्सना व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. सध्या भारतात 16 कोटी अॅक्टिव्ह व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर सध्या पर्सनल मेसेजिंग, ग्रुप चॅट, व्हॉईस कॉल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेतच. सध्या स्काइप, फेसबुक, गुगल ड्युओ, व्हायबर यासारख्या काही सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हीडिओ कॉलिंग उपलब्ध आहे.

कसा कराल व्हीडिओ कॉल?

प्ले स्टोरवर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा

फोन आयकॉनवर क्लिक करून ऑडियो कॉल वर क्लिक करा

व्हॉइस आणि व्हीडिओ यातून व्हीडिओ कॉलचा पर्याय निवडा... झालं!

 

पुढील बातमी
इतर बातम्या