व्हॉट्सअॅप झालं डाऊन, जगभरातील युजर्समध्ये गोंधळ!

भारतासह जगभरात सर्वात लोकप्रिय असलेलं व्हॉट्सअॅप मोबाईल अॅप्लिकेशन तब्बल अर्ध्या तासापासून बंद पडलं आहे. यासंदर्भात अनेकांनी कंपनीकडे तक्रारही नोंदवली आहे. मात्र ही समस्या अद्याप सोडवण्यात आली नाही. त्यामुळे जगभरातल्या व्हॉट्सअॅप युजर्समध्ये तणावाचं वातावरण आहे.

दरम्यान, तज्ञांच्या मते व्हॉट्सअॅपचा सर्व्हर काही कारणास्तव डाऊन झाल्यामुळे ही समस्या आली असावी. मात्र, याबाबत निश्चित असं कारण सांगता येणार नसून अनेक कारणांपैकी हे एक कारण असण्याची शक्यता आहे.

काही वेळापूर्वी फेसबुकही काही काळासाठी संथ झालं होतं. मात्र, फेसबुक आता पुन्हा पूर्ववत सुरु झालं. व्हॉट्सअॅप मात्र अद्याप सुरू झालेलं नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्समध्ये गोंधळाचं वातावरण आहे. ट्विटरवर व्हॉट्सअॅप युजर्स आपला संताप, नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही युजर्स खिल्लीही उडवत आहेत!

पुढील बातमी
इतर बातम्या