आता व्हॉट्सअॅपवर करा गृप व्हिडिओ कॉल

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण व्हाट्सअॅपने ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे नवीन फिचर आणलं आहे. ज्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे.

या ग्रुप व्हिडिओ कॉलिंगमुळे एकावेळी चार जणांना एकमेकांशी बोलता येणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लेटफॉर्मवर हे फिचर उपलब्ध असतील. व्हॉट्सअॅपने मंगळवारी याची घोषणा केली.

'हीच योग्य वेळ'

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ही सुविधा आणण्याची हीच योग्य वेळ होती. कारण दररोज 1 अब्जहून अधिक लोक सरासरी 2 अब्ज मिनिटापर्यंत फोनवर बोलतात.

प्रयत्नांना यश

व्हॉट्सअॅपने एका ब्लॉगमध्ये म्हटलं आहे, हा ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फीचर आणण्यासाठी मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरू होते. आता हे फिचर आणण्यात यश आल्यानं खूप आनंद होत आहे. लोकांनीही व्हॉट्सअॅपवर व्हाईस आणि व्हिडिओ कॉलिंगला चांगलीच पसंती दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या