KBC 12: नाझिया नसीम ठरली 'या' पर्वाची करोडपती

बुधवारी केबीसीची स्पर्धक नाझिया नसीम या हंगामातील पहिली करोडपती बनून इतिहास रचणार आहे. झारखंडच्या रांची इथली रहिवासी नाझिया सध्या दिल्लीत वास्तव्याला आहे.

नेहमी अभ्यास करणं, स्वतंत्र विचार आणि स्त्री काय करू शकते हे दाखवण्याची तिच्यात ओढ आहे. याच गुणांमुळे तिनं हॉट सिटवर उत्तम खेळ दाखवला.

भारतीय मास कम्युनिकेशनची माजी विद्यार्थी नाझिया रॉयल एनफील्ड इथं इंटर्नल कम्युनिकेशन्सच्या ग्रुप मॅनेजर म्हणून काम करते. तिनं बर्‍याच कॉर्पोरेट ठिकाणी काम केलं आहे.

तिनं आपल्या पती आणि कुटुंबाला तिला पाठिंबा देण्याचं श्रेयं दिलं. विशेषत: अशा समाजात जिथं बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की, मूल झाल्यावर स्त्रिया काम करू शकत नाहीत. तिचा विश्वास आहे की, जर एखाद्या स्त्रीचे समर्थक पती आणि कुटुंब असेल तर जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे.

एक लाईफ लाइन बाकी असताना नाझियानं एक कोटी प्रश्नाचं अचुक उत्तर दिलं. आता सात कोटींच्या प्रश्नासाठी ती आपलं नशीब आजमावणार आहे. ती सात कोटी रुपयांपर्यंत पोडचू शकते की नाही हे बुधवारच्या भागात कळेलच.


पुढील बातमी
इतर बातम्या