रणवीर सिंहचे छोट्या पडद्यावर पदार्पण, 'हा' शो करणार होस्ट

तो एका टीव्ही शो द्वारे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्जबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मोठ्या पडद्यावरील यशानंतर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 

रणवीर छोट्या पडद्यावर ‘द बिग पिक्चर’ नावाचा क्विझ शो घेऊन येत आहे. कलर्स टीव्हीवर रणवीरचा हा नवीन शो येणार आहे. या शोचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या शोची निर्मिती बानीजय एशिया आणि आयटीव्ही स्टुडिओ ग्लोबल एंटरटेनमेंट बी व्ही यांची आहे.

शनिवारी कलर्स वाहिनीनं एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ‘द बिग पिक्चर’चा प्रोमो शेअर केला आहे. शोच्या या पहिल्या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे की, रणवीरचा हा गेम शो चित्रांवर आधारित असेल. मात्र, या शोची नक्की संकल्पना काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

हा नवीन शो एक क्विझ शो आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या ज्ञान आणि मेमरीची चाचणी घेतली जाणार आहे. स्पर्धकांना व्हिज्युअलवर आधारित १२ प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. शोमध्ये तीन लाइफलाइन देखील आहेत.

आपल्या टीव्हीवरील पदार्पणाबद्दल रणवीर सिंहनं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, एक कलाकार म्हणून माझ्या प्रवासात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्याची आणि एक्सप्लोर करण्याची इच्छा होती. म्हणूनच आता मी टीव्हीद्वारे लोकांचं मनोरंजन करणार आहे. भारतीय सिनेसृष्टीनं मला खरोखर खूप काही दिलं आहे, ज्याचा मी नेहमीच आभारी असेन.


हेही वाचा

बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्यावर पालिका करणार कारवाई

पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार इरफान खान, 'या' चित्रपटात झळकणार

पुढील बातमी
इतर बातम्या