'इब्लिस' नाटकात पाहा शेवंताची अदाकारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • नाटक

झी मराठीवर येणारी रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता तर सर्वांनाच माहित आहे. आपल्या अदांनी अण्णांसोबतच तिनं प्रेक्षकांना देखील घायाळ केलं. आता हीच शेवंता टेलिव्हिजनवरून थेट रंगभूमीवर तुमच्या भेटीला येणार आहे. शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर 'इब्लिस' या नाटकात आपली अदाकारी दाखवताना दिसणार आहे.

'इब्लिस' या नाटकाचा पोस्टर अपूर्वानं नुकताच इन्स्टावर शेअर केला आहे. या नाटकात तिचं 'जुई' असं नाव असणार आहे. 'शैतान हाजिर' अशी या नाटकाची टॅगलाईन आहे. अपूर्वा सोबत अभिनेते वैभव मांगले हे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसंच राहुल मेहेंदळे आणि सुनील देव हे कलाकार देखील महत्त्वाच्या भुमीका साकारणार आहेत.

२१ डिसेंबर २०१९ ला हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्री ८.३० वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हे नाटक पाहता येईल. बाकी नाट्यगृहात लवकरच हे नाटक पाहता येईल


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या