तिसरी घंटा वाजणार! 'या' तारखेपासून ५० टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • नाटक

५० टक्क्यांच्या मर्यादेसह ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी नाट्यगृह सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आला नव्हता. मात्र, आता त्याबाबतही निर्णय झाला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे उपस्थित होते. आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहे सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवसांआधीच भाविकांनी मूर्ती घरी आणावी, असं आवाहन मुंबई महापालिकेनं भाविकांना केलं आहे. तसंच नैसर्गिक विसर्जन स्थळावरही नागरिकांना थेट विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे.


हेही वाचा

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित, गणेश चतुर्थीनिमित्त चाहत्यांना भेट

आशय कुलकर्णी आणि सिद्धी तुरे या नव्या जोडीचा 'मुंबईचा नवरा' गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार

पुढील बातमी
इतर बातम्या