भांडुपकरांना दिवीळीची मेजवानी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • नाटक

भांडुप - कोकणातील दशावताराची परंपरा जीवंत राहून ती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी पुरोहीत भास्कर बर्वे यांनी भांडुपकरांना दिवाळीनिमित्त दोन दशावतारी नाटकांची मेजवानी दिली आहे.

नरदासनगर येथे २ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता महाकाली जागरण हे पैराणीक नाटक, तर ३ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता साईहील येथे उषास्वप्न बाणासुर हा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या दोन्ही नाटकांमध्ये कोकणातील ज्येष्ठ नाट्य, दशावतार कलाकार आपली कला सादर करणार असल्यानं भांडुपकरांसाठी ही खरोखरच परंपरा जपणुकीची मेजवानी ठरेल.

पुढील बातमी
इतर बातम्या