ठाणे-कल्याण स्थानकांवर एक्स्प्रेसला मिळणार ५ थांबे

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण या स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्याची मुदत आता वाढवून देण्यात आली आहे.

कल्याण-ठाणे स्थानकात ५ एक्स्प्रेसला थांबा देण्यात येत होता. नुकतीच या थांब्याची मुदत संपुष्टात आली. मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने ३० जूनपर्यंत या एक्स्प्रेसला थांबा देण्याच्या निर्णयाला मंजूरी देत मुदत वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कल्याण-ठाणेमधील लाखो प्रवाशांची पायपीट थांबणार आहे.

कुठल्या गाड्यांना थांबा

कल्याण-ठाणे स्थानकात ३ अप आणि २ डाऊन एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यात १२१३८ फिरोझपूर-सीएसएमटी पंजाब मेल, ११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, १२११० मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, २२१०१ सीएसएमटी-राज्यराणी एक्स्प्रेस आणि १८५२० सीएसएमटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

६ महिने मुदतवाढ

मध्य रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. यात ठाणे-कल्याण स्थानकातील प्रवाशांसाठी ५ एक्स्प्रेस थांब्याना मुदतवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या थांब्याला पुढील ६ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.


हेही वाचा-

आता एसी लोकलचं तिकीटही मिळणार मोबाईलवर!


पुढील बातमी
इतर बातम्या